विशाळगड (जि.कोल्हापूर) येथील घटना व सद्य:परिस्थितीबाबत अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडून दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे आयोजित बैठकीतून माहिती घेतली.
या घटनेमुळे समाजात तेढ निर्माण होऊ नये. अल्पसंख्याक समाजातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होऊ नये याची प्रशासनाने दक्षता घ्यावी. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शांतता समितीच्या बैठका घ्याव्यात, अशा सूचना अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या.