#विधानसभाकामकाज: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गवाही – श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन, संजय गांधी निराधार अनुदान, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्य योजनांचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खाती प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन,संजय गांधी निराधार अनुदान, दिव्यांग बांधवांसाठीच्या योजनांसह सर्वच विशेष सहाय्य योजनांचे पैसे पात्र लाभार्थ्यांच्या खाती प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला जमा करण्याचे निर्देश देण्यात येतील-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचाविणारा कोणताही खेळाडू लाभापासून वंचित राहू नये, यासाठी या खेळाडूंच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्यासाठीच्या निकषांमध्ये आणखी मुद्दे समाविष्ट करण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
खेळाडूंना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार शासकीय नोकरी देण्यासाठीचे निकष निश्चित करण्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. आवश्यकता असल्यास निकषांमध्ये आणखी मुद्दे समाविष्ट करण्यात येतील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले.