मूर्तिजापूर मतदार संघातील ३८५ मतदान केंद्रांवरील प्रक्रिया हाताळणारी फौज रवाना
मूर्तिजापूर मतदार संघातील ३८५ मतदान केंद्रावरिल प्रक्रिया हाताळणारी फौज रवाना मूर्तिजापूर – मूर्तिजापूर विधानसभा ३२ अंतर्गत लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून लोकसभा निवडणुकीसाठी १७२० कर्मचारी, अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेले अधिकारि/ कर्मचारी मतदार संघात मतदान केंद्रनिहाय रवाना झाले आहेत. मूर्तिजापूर उपविभागात मूर्तिजापूर व बार्शीटाकळी तालुका तसेच अकोला तालुक्यातील काही गावे मिळून विधानसभा संघातील ३८५ मतदान केंद्र असून, सुमारे १७२० मतदान अधिकारी/कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या इतर कामाकरिता ३८० कर्मचारी असून, पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आलेले आहेत. निवडणुकीच्या कामासाठी एकुण सुमारे २०६० कर्मचारी, अधिकारी कर्मचारी तयार करण्यात आले आहेत. मतदान यंत्र शासकीय धान्य गोदाम येथील सुरक्षा कक्षामध्ये सीलबंद ठेवण्यात आलेले आहे. २५ एप्रिल रोजी मतदान पथके मतदान साहित्यसह नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर सकाळी १० वाजता पासून रवाना करण्यात आली आहेत. त्याकरिता एसटी महामंडळ कडून ५४ व खासगी वाहने ५५ व क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी ४० वाहनांचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. मतदानानंतर मतदान साहित्य प्राप्त करून घेऊन मतदान यंत्र अकोला येथील वखार महामंडळ येथे तयार करण्यात आलेल्या ईव्हीएम स्ट्रॉग रूममध्ये पाठविण्याची आवश्यक कर्मचारी व पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.मतदानाच्या दिवशी लग्नाची तीथ दाट असल्याकारणाने मतदानावर याचा किती परिणाम होतो हे पाहणे औचित्याचे ठरेल. ” लोकसभा निवडणुकीकरिता प्रशासन सज्ज असून लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी मतदानाचा आपला हक्क आवर्जून बजावावा. ता.२६ एप्रिल लग्नाची तिथी दाट असल्या कारणाने “आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे ” या म्हणीचा प्रत्यय येईल अशी अपेक्षा आहे. संदिपकुमार अपार सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर यांनी व्यक्त केली आहे.
विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.