मूर्तिजापूरात पाचशे, दोनशे, शंभर, पन्नासच्या नकली नोटा चलनात
महिलांकडून चालविल्या जातात नोटा
मूर्तिजापूर :- अलीकडेच मूर्तिजापुर आत पाचशे, दोनशे, शंभर आणि आणि पन्नास रुपयांच्या नकली नोटांचा चलनात मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याची बाब समोर आली आहे. शहरात नकली नोटांचा काळाबाजार सुरू झाला आहे. असाच प्रकार अनेकदा घडल्याची माहिती आहे. अशाच ऒ व्ही सी ५२६०५३ या क्रमांकाची शंभर रुपयांची व ४ सीबी ८३५०११ या क्रमांकाची पन्नास रुपयांची नोट येथील अपर्णा मेडिकलचे संचालक डॉ. जगदीश कडू यांच्याकडे आढळून आली. तर दुसरी पाचशे रुपयांची नोट किराणा व्यवसायी गौरव मोरे यांना प्राप्त झाली. हुबेहुब खऱ्या नोटेसारखी दिसणाऱ्या आणि त्यावर नोटेचा नंबर व भारतीय रिजर्व बँक असे अंकीत केलेल्या या सर्व नोटा आहेत. या नोटा महिलांकडून चलनात आणल्या जात असल्याचे संबधितांचे म्हणणे असून तसे सीसीटीव्ही चित्रीकरणही समोर आले आहेत सदर महिला या चेहऱ्यावर रुमाल अथवा स्कार्फ बांधून दुकानात गर्दी बघून या नकली नोटा चालवीत आहेत. असे प्रकार यापूर्वी सुध्दा घडल्याने या मागे नकली नोटा चलनात आणणारे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अशा नकली नोट चलनात आल्याने खळबळ उडाली आहे. सदर नोटा रंग, रूपाने अगदी खऱ्या नोटांसारख्या दिसून येतात नोट मूळ नोटेपेक्षा किंचित आकाराने मोठी असून, असली पाचशे, शंभर, दोनशे व पन्नास रुपयांच्या नोटेवरच्या सर्वच बाबी या नकली नोटांवर अंकित केलेल्या आहेत त्यामुळे ही नोट बघीतली तर ती चक्क खरी असल्याची खात्री होते. जेव्हा हातात घेऊन बारकाईने निरीक्षण केले असता नोटेचा कागद दर्जाहीन असून पारदर्शक भागातील महात्मा गांधींचे चित्र गायब आहे. त्याचबरोबर नोटे मध्ये भारत, इंडिया लिहिलेली चमकदार तार सुद्धा दिसून येत नाही. या नकली नोटा खऱ्या नोटात एकत्र करून सफाईदारपणे किंवा गर्दीच्यावेळी चलनात आणल्या जात असल्याने नागरीकांत व व्यापाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे नागरिकांनी उपरोक्त नोटा घेताना त्या नोटेचा कागद व नोटेवर असलेल्या पारदर्शक भागातील गांधीजींचे छायाचित्र बघून घेतल्यास खऱ्या आणि खोट्या नोटेतील फरक लक्षात येईल.
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला