महाराष्ट्र हे एक कुटुंब मानून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. शेतकरी, कामगार, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिकांना सामावून घेत जनतेचे दुःख हलकं करू शकलो याचे समाधान असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते
.
.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या महत्त्वाच्या घोषणा
– प्रत्येक तालुक्यात ‘संविधान भवन’ उभारणार
– वीरशैव कक्कय्या आणि महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणार
– श्री माता महाकाली मंदिर यात्रा परिसर विकासासाठी २५० कोटी
– मुंबई सफाई कामगारांच्या निवासस्थानांचा पुनर्विकास
– परिवहन वाहनांचे विलंब शुल्क स्थगिती
– पालघरला विमानतळ करणार
.
.
मुख्यमंत्री म्हणाले, सुखी कुटुंबाचा विचार करून सरकारने विविध योजना आखल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत वर्षाला १८ हजार रुपयांचा माहेरचा आहेर, अन्नपूर्णा योजनेंतर्गत वर्षाला तीन मोफत गॅस सिलिंडर, महिलांना ५० टक्के तिकीट दरात आणि ज्येष्ठांना मोफत एसटी प्रवासाचा लाभ, शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा, मुलींच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च आता सरकार घेणार आहे. युवा अप्रेंटिंसशीप योजनेतंर्गत १० लाख सुशिक्षित तरुणांना १० हजार रुपयांपर्यंतचा स्टायपेंड, महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती दीड लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढविली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी तीर्थस्थळ दर्शन योजनाही आणली आहे.