विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर
CEN News, अकोला
मूर्तिजापूर: मूर्तिजापूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या बिडगाव आणि मोझर येथील सिमेंट काँक्रीट रस्त्यांत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी न करता जिल्हा परिषद अकोला मुख्याधिकारी यांच्या पत्रास केराची टोपली दाखवणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ मोझर येथील इसमाने ७ मे रोजी स्थानिक गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला असता. त्यास ग्रामीण पोलिसांनी अटक करून आत्महत्या न करण्याचे लिहून योग्य कारवाई केली.
मोझर येथील संजय तुळशीराम काकड यांनी ग्रामपंचायत बिडगाव आणि मोझर येथे अर्धवट झालेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्यांत ३५ लाख आणि १२ लाख रुपयांच्या झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल आमरण उपोषण केले असता. अकोला जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी यांनी उपोषण मागे घेतले. अकोला जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी मूर्तिजापूर गटविकास अधिकारी यांना याप्रकरणी चौकशी करण्याचे पत्र देऊनही कोणत्याच प्रकारची चौकशी न केल्याने संजय काकड यांनी दोन दिवसात चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अन्यथा ७ मे रोजी मुर्तीजापुर पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला. मला आत्मदहन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी गटविकास अधिकारी जबाबदार असल्याचे निवेदन देत आत्मदहन करीत असताना मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी अटक करून त्याच्याजवळून लिहून घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सोडण्यात आले।