नाल्याच्या पुरात वाहून गेलेल्या मृतदेहास वीर भगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाने काढले शोधून..!
अकोला -जिल्ह्यात सलग झालेल्या दिवस सततधार पावसामुळे नदी, नाल्यांना पुराची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सांगळूद येथे रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याला पुर आल्याने 9 जुलै मंगळवार रोजी सांगळूद येथिल 50 वर्षीय राजेंद्र उत्तमराव आठवले यांचा पाय घसरल्याने ते नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पुरात वाहुन गेलेले राजेंद्र उत्तमराव आठवले यांचा बराच वेळ शोध घेऊनही शोध लागला नाही सदर घटनेची माहिती बोरगांव मंजू पोलीस स्टेशनला कळताच बोरगाव मंजू पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.व घटनेची माहिती वीर भगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाला देऊन पाचारण करून घेतले. वीर भगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाच्या दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर अखेर सांगळुद येथुन नाल्याच्या प्रवाहत वाहत गेलेला आठवले यांचा मृतदेह २ ते ३ किलोमीटर लांब एका काटेरी झूडपात अटकलेल्या अवस्थेत वीर भगतसिंग आपत्कालीन शोध व बचाव पथकास शोधण्यात यश आले. यशस्वी रेस्क्यू कामगिरी करीता वीर भगतसिंग आपत्कालीन शोधू बचाव पथकाचे संपर्क प्रमुख योगेश विजयकर, अध्यक्ष विजय माल्टे, उपाध्यक्ष शाहबाज शाहा, सै.माजिद,मोहन वाघमारे,शेख नजिर, प्रकाश चव्हाण,शेख मोईन , यांनी यशस्वी कामगिरी केली आहे यावेळी घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे सांगळुदचे सरपंच रंजीत काळे , योगेश काटकर आदी उपस्थित होते.
कॅमेरामन शाम वाळसकर सह प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.