तंत्रशिक्षण संचालनालय और मेकर भवन फाउंडेशन में करार, इंजीनियरिंग कॉलेजों की लैब होंगी आधुनिक

cennews.in By cennews.in
1 Min Read
तंत्रशिक्षण संचालनालय और मेकर भवन फाउंडेशन में करार, इंजीनियरिंग कॉलेजों की लैब होंगी आधुनिक

तंत्रशिक्षण संचालनालय और मेकर भवन फाउंडेशन में करार, इंजीनियरिंग कॉलेजों की लैब होंगी आधुनिक

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील यांच्या उपस्थितीत तंत्रशिक्षण संचालनालय आणि मेकर भवन फाऊंडेशन यांच्यात #सामंजस्यकरार करण्यात आला. यामुळे राज्यातील स्वायत्त अभियांत्रिकी पदवी संस्थांमध्ये मेकर भवन फाउंडेशनमार्फत प्रयोगशाळांचे अ‌द्यावतीकरण करणे शक्य होणार आहे.
राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रयोगशाळातील तंत्रज्ञान सध्याच्या उद्योगांच्या गरजेनुसार असले पाहिजे. महाविद्यालयांकडे असलेल्या प्रयोगशाळा आधुनिक तंत्रज्ञानाने अधिक सक्षम असल्यास सद्यस्थितीतील व भविष्यातील उद्योगांच्या गरजेनुसार विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करणे शक्य होईल, असे मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
हा करार प्राध्यापक प्रशिक्षण, अभ्यासक्रमाचे आधुनिकीकरण व उद्योग-शैक्षणिक समन्वय मजबूत करण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे. राज्यातील तंत्रशिक्षण अधिक प्रयोगशील, नवोन्मेषाभिमुख व उद्योगसुसंगत करण्यासाठी राज्यात प्रारंभी सात शासकीय व अनुदानित स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अत्याधुनिक मेकर स्पेस लॅब्स स्थापन करण्यात येणार आहे. या लॅबमध्ये अत्याधुनिक उपकरणे, डिजिटल फॅब्रिकेशन सुविधा, प्रोटोटायपिंग साधने व प्रकल्पाधारित शिक्षणासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत – मंत्री पाटील
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, सह संचालक डॉ. सुनील भामरे, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मेकर भवन फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम खन्ना व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *