उभ्या ट्रकला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्स ने दिली धडक…!
मुर्तिजापूर:- येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पॉपुलर पेट्रोल पंप नजीक उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स ने धडक दिल्याची घटना रविवार दि.३० च्या मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली आहे.
अकोला येथे कनोजीया यांच्या सारखपुडा कार्यक्रमास नागपूर वरून आलेल्या वऱ्हाडावर काळाने घात केल्याची घटना मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ नजिक पॉपुलर पेट्रोल पंप समोर उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक टी.एस.02 यूडी.4286 ला मागून येणाऱ्या वऱ्हाडांची ट्रॅव्हल्स क्रमांक एम. एच.40 बी.एल 1117 ने मागून धडक दिल्याने भीषण अपघात घडल्याची घटना रविवारच्या मध्यरात्री घडली.सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी घडली नसली तरी ट्रॅव्हल्स मधील नागपूर येथे जाणाऱ्या २८ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहे.यामध्ये ईश्वर राजाराम कनोजिया (३९), सुशिलाबाई अर्जुन बैसवारे (७५), महेंद्रसिंह धमरसिंह साकेवार,गणेश कन्हैयालाल चौधरी,राधाबाई सुरज बैसवारे (४०),राजू ब्रह्मलाल बैसवारे (६५),मुकेश पापालाल कनोजिया (५१), आरती अशोक कनोजिया (४०),किशोर बाबालाल कनोजिया,जय राजू रडके (१९), अशोक लालचंद कनोजिया (४५), रमेश पन्नालाल बैस्वारे (६१), धर्मेंद्र शंकरलाल बैस्वारे (४३), मनोज नथू बैस्वारे (६३), अशोक लक्ष्मण बैस्वारे(६३), वासुदेव दिवाग अंबोने (५९), दुर्गेश केशवराव लुटे (३४),सरला बंशी कनोजिया (५५),राधिका ईश्वर कनोजिया,गेंदालाल छोटेलाल कनोजिया,राजेश जगन्नाथ कनोजिया,ममता शिव कनोजिया,मनीष हिरालाल मोरे,रिना श्यामलाल कनोजिया,साक्षी नंदलाल कनोजिया,माया राजू बैस्वारे,संजय नंदू कनोजिया,अनुप कनोजिया असे एकूण २८ अपघातग्रस्त गंभीर असून त्यांना पुढील उपचारार्थ श्रीमती लक्ष्मीबाई उपजिल्हा सामान्य रुग्णालय व अवघाते रुग्णालयात हलविण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी डॉ.गौरव गोसावी, डॉ.विशाल येदवर यांच्यासह अपघाताची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरताच शहरातील डॉ.प्रशांत अवघाते,डॉ.स्वप्निल गुल्हाने,डॉ. खुशबू गुल्हाने,डॉ.विनोद जेठवानी,डॉ.चंदन निमोदिया,डॉ.इमरान खान यांनी तात्काळ श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय गाठून जखमींवर उपचार केले.तर शहरातील समाजसेवक आतिश महाजन,सुनील लछूवानी,लकी अग्रवाल,आकाश महाजन,जितेश पवार,शुभम शिंगारे,स्वप्निल चौधरी,गणेश श्रीवास,पत्रकार नरेंद्र खवले,सुमित सोनोने,प्रतीक कुऱ्हेकर,अक्षय देशमुख,संतोष माने यांनी घटनास्थळावरून जखमींना श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे हलविले.
———————————-
विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.