आज शाळेची पहिली घंटा वाजणार…!
* शालेय साहित्य खरेदीसाठी पालक, विद्यार्थ्यांची गर्दी.
मूर्तिजापूर : आज १ जुलै रोजी शाळेची पहिली घंटा वाजणार असल्याने शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालक आणि मुलांनी अकोला व तालुक्याच्या ठिकाणी शहरातील दुकानामध्ये गर्दी केली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत बुक डेपोमध्ये वही, पेन, बुक, दप्तर यासह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. साहित्याच्या किमती काही प्रमाणात वाढल्या आहेत. जुने पुस्तके घेण्यावरही विद्यार्थी, पालकांचा कल दिसून येत आहे. शाळेच्या ड्रेससाठी पालक विद्यार्थ्यांना, पाल्यांना घेऊन दिसत आहेत. तर खाजगी शाळेंकडून पालकांची फिज च्या बाबतीत असेल अथवा शालेय गनवेशा व्यतिरिक्त मूर्तिजापूरातील काही खाजगी शाळांनी दर शनिवारी लोअर आणि टी शर्ट विद्यार्थ्यांना बंधनकारक केल्याने पालकांचे मोठे आर्थिक भूदंड सोसावा लागत असून संबंधित शाळेने शहरातील एका व्यावसायिकास कॉन्ट्रॅक्ट दिल्याने सदर व्यावसायिक हा शालेय विद्यार्थ्यांचे टीशर्ट व लोअर चे अव्वाचे सव्वा किमती लावत असल्याने पालकांमध्ये संतापाची लाट पसरली असल्याचे बोलल्या जात आहे.
आज १ जुलै रोजी शाळांची घंटा वाजणार असल्याने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळाही सज्ज झाल्या आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
———————————-
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.