अकोल्यात दोन गटात दगडफेक; संतप्तांकडून वाहनांची जाळपोळ..!
____________
अकोला :- जुने शहर भागातील हरिहर पेठ परिसरात सोमवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान दोन गटात दगडफेक मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. यानंतर काही संतप्तांकडून वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जुने शहरातील हरीहर पेठ या परिसरात सायंकाळी दोन गटात दगळ फेक व नंतर वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. यामध्ये एक ऑटो व दुचाकी जाळण्यात आली. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग व पोलीस अधिकारी दाखल झाले असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आह़े. दरम्यान या घटनेमागचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र ऑटोरिक्षाची दुचाकीला धडक लागून हा वाद उफाळला अशी माहिती समजते. नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवावर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
———————————
विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.