सूर्यास्ताच्या साक्षीने मूर्तिजापूर शहरात भगवान परशुराम जन्मोत्सव उत्साहात..!
* शहरातून शोभायात्रा, ठिकठिकाणी स्वागत.
•”जय परशुराम”च्या जय-घोषात मूर्तिजापूर शहर दुमदूमले.
मूर्तिजापूर :- भगवान परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या वतीने ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त १०मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास श्री स्वामी समर्थ मंदिर जुनी वस्ती येथून महाआरती करून मोटार सायकल शोभायात्रेची वाजत-गाजत सुरुवात करण्यात आली. ‘जय परशुराम’च्या जयघोषात शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर, टांगा चौक, मोरारजी चौक, तोलाराम चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन रोड, चिखली गेट रोड, मारिमाता मंदिर मार्गे स्टेशन विभाग स्थित असलेल्या प्रभू श्री राम मंदिर या शहरातील प्रमुख मार्गांवरून शोभायात्रा काढण्यात आली. प्रारंभी भगवान परशुराम व श्री स्वामी यांच्या प्रतिमेचे सार्वजनिक भगवान श्री परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष श्रीकांत जोशी,डॉ. अर्पण दुबे, भरत जमादार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शोभायात्रेच्या अग्रभागी अश्व, भगवान परशुराम यांची मूर्ती असलेला रथ होता.
मिरवणूकीच्या अग्रभागी पारंपारिक वेशभुषा, भगव्या टोप्या वस्त्र परिधान करुन बंधुभगिनी सहभागी झाले होते. त्यानंतर तरुण-तरुनींनी व ब्रह्मरुंदांनी दुचाकी रॅली, पारंपरिक वाद्याचे पथक, भगवान परशुराम व शंकराचार्य यांचे चित्ररथ अग्रभागी होते. या मोटरसायकल शोभायात्रेत “जय परशुराम, जय जय परशुराम ” या तरुण-तरुणींच्या जय घोषाने शहर दुमदुमले होते तर वाटेत वरून राजाने वर्षाव करनू भगवान परशुराम यांना अभिवादन केले. भगव्या परशुराम असलेल्या झेंड्यामुळे शोभा यात्रेत भगवे मय वातावरण निर्माण झाले होते. शोभायात्रेच्या मार्गात ठिक-ठिकाणी शहरातील अनेकांनी पुष्प वर्षाव करून रॅलीचे स्वागत केले. श्री स्वामी समर्थ मंदिर येथे जमादार परिवार यांनी थंड पेय व स्टेशन विभाग परिसरात ललित टी कॅफेचे संचालक ललित तिवारी व भुरा तिवारी यांनी आईस्क्रीम चे वाटप केले. शोभायात्रेचा समारोपण स्टेशन विभाग स्थित असलेल्या प्रभू श्रीराम मंदिर येथे भगवान परशुराम यांची महाआरती करून करण्यात आला. मोटार सायकल शोभायात्रेच्या यशस्वीते करीता सार्वजनिक भगवान श्री परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, प्रा.दिपक जोशी प्रतिक कुऱ्हेकर, डॉ. अर्पण दुबे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात अनिरुद्ध गणोरकर, नयन पांडे, उल्हास पळसोकर, निनाद पाठक,अनंत पांडे, अशोक दुबे,पालिवाल काका,सिद्धेश जोशी,आयुष तिवारी,राजा तिवारी,तेजस जोशी,राहुल मुलमुले,सुदर्शन दुबे,वेदांत जमादार,अनिकेत कंझरकर,रवी बढे आदी सार्वजनिक श्री भगवान परशुराम जन्मोत्सव शोभायात्रा समिती व सर्वभाषीय ब्राम्हण समाजाच्या युवक-युवतींनी अथक परिश्रम घेतले.
विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.