लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी प्रत्येक मतदाराचे मतदान महत्त्वपूर्ण व निर्णायक आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजाविल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्व नाही. राष्ट्रीय कर्तव्याच्या भावनेतून मतदानाचे प्रमाण यंदा वाढवून ते ७५ टक्क्यांपर्यंत नेतील, असा विश्वास मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी आज अमरावती जिल्ह्याच्या आढावा बैठकीत व्यक्त केला.