यश ने आपल्या आई-वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न केले साकार…!
अकोला :-
मूर्तिजापूर :-ध्येय गाठण्यासाठी जिद्द आणि मेहनत असेल तर सर्वच गोष्टी शक्य होतात. असंख्य लोकांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर यश संपादन केले आहे. लाखो तरुण निट ची तयारी करत आहेत. दरवर्षी यातील शेकडो जण त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करतात आणि परीक्षा उत्तीर्ण करतात. पण हा प्रवास प्रत्येकासाठी सोपा नाही. यासाठी अनेकांना खूप संघर्ष करावा लागला आहे. अशाच एक मुलाची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. यश जगदीश कडू ह्याने निट च्या परीक्षेत ७०० पैकी ५९३ गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलं आहे.
वडिल डॉक्टरी पेशात , तर आई गृहिणी.. मात्र, त्यांचे स्वप्न एकच, आपल्या मुलांनीही इतरांप्रमाणे शिकून मोठे व्हावे. जन्मदात्यांचे हे स्वप्न साकार करायचे ध्येय उराशी बाळगून यश जगदीश कडू याने निट च्या परीक्षेत ७०० पैकी ५९३ गुण प्राप्त केले आहेत. त्याला आपल्या वडिलांप्रमाणे डॉक्टर व्हायचे आहे आणि आपल्या गावातच राहून रुग्णांची सेवा करायची आहे असे यश ने आमच्या प्रतिनिधिशी बोलतांना सांगितले आहे.
निट च्या परीक्षेत चांगले मार्क्स मिळावे या करीता पालक आपल्या मुलांना मोठ्या शहरात पाठवून तेथील भल्यामोठ्या क्लासेस मध्ये टाकतात मग त्यात आपल्या गावाकडून तेथे राहायचे म्हणजे राहण्याचा खर्च, खाण्याचा खर्च,गाडीचा खर्च वेगळाच लाखो रुपये खर्चून बाहेर गावी मुलांना पाठवून जे शक्य गेल्या जात नाही तेच आपल्या गावात राहून मंडलापुरे व आखरे फाउंडेशन च्या माध्यमातून यश जगदीश कडू या मुलाने निट च्या परीक्षेत घावघवीत यश संपादन करून आपल्या आई-वडिलांचे व आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. यश याने सलग २ वर्ष अहोरात्र डोळ्यात तेल टाकून अभ्यास केला आपले आई, वडील आणि गुरु हेच आपले मार्गदर्शक आणि हेच आपले मित्र समजून महाविद्यालयीन वयातही मित्र मैत्रिणी न ठेवता, कुठलेही सोशल मिडीयचे म्हणजे च फेसबुक, इंस्टाग्राम चा दूर -दूर पर्यंत विचारही न करीता फक्त आपले आखरे सर जे सांगतील त्याच मार्गांवर चालत आज निट च्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपल्या आई-वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न यशने साकार करून दाखविले आहे. यश ने याचे श्रेय आपले आई-वडील आणि मार्गदर्शक डॉ मंडलापुरे सर आणि प्रा. आखरे सर यांना दिले आहे.
विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.