मुर्तीजापुर तहसील कार्यालय परिसरात ” लाडकी बहीण योजनेच्या” नावाने महिलांचे आर्थिक लूट..!
अकोला :-
अकोला जिल्हतील मूर्तिजापूर येथे “लाडकी बहीण योजने” साठी महिला लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच या योजनेच्या नावाखाली सेतू केंद्र चालक अथवा तहसील कार्यालय परिसरातील एजंटकडून ५०० ते ६०० रुपये महिलांकडून घेतले जात असल्याचं CEN News ने केलेल्या स्त्रिन्ग ऑपरेशन मध्ये समोर आलं आहे.
राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मोठी घोषणा केली. आजपासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीसाठी १५ जुलै ही अंतिम तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या नोंदणी केंद्राबाहेर महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मूर्तिजापूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तहसील कार्यालय परिसरात लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची लूट करण्यात येत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तसेच येथील सेतू केंद्रावर अथवा तहसील कार्यालय परिसरातील एजंटकडून ५०० ते ६०० रुपये महिलांकडून सदर योजनेच्या नावाखाली घेतले जात असल्याचं समोर आलं आहे.
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.