बदलत्या ऋतूचा फटका लहान मुलांचा वयोवृद्धांना पडण्याची शक्यता..!
कॅमेरामन : शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ : प्रतिक कुऱ्हेकर ,CEN News अकोला.
मूर्तिजापूर :- बदलत्या ऋतुमानानुसार येणाऱ्या आजारांचा फटका लहान मुलांन सह मोठ्यांना होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. हवेतील प्रदूषकांच्या वाढीस हे एक प्रमुख कारण असते. ज्याचा लहान मुलांसह वृद्धांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे आजारी पडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे मुलांची व वयोवृद्धांची सुरक्षा आणि आरोग्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे.
पावसाचे घाण पाणी किंवा डबक्यांमध्ये विविध हानिकारक मच्छर,जंतू, जिवाणू, विषाणू आणि कीटकांचे प्रजनन केंद्र बनू शकतात. त्यांच्या संपर्कात मुले किंवा वयोवृद्ध व्यक्ती आल्यास त्यांना डेंग्यू सारखा संसर्ग होऊ शकतो. मुसळधार पावसात जंतूंमुळे पिण्याचे पाणी दूषित होऊ शकते. ज्यामुळे गॅस्ट्रो इंटेस्टाइनल इन्फेक्शन, डायरीया, मलेरिया होण्याचा धोका संभवतो. तापमानातील चढ-उतार आणि ओलसर हवा लहान मुलांसाठी व वयोवृद्ध नागरिकांसाठी हानिकारक ठरू शकते. ज्यामुळे नाक आणि घशाशी संबंधित संक्रमण होऊ शकते.
अशातून बचाव करण्याकरिता घेण्याची काळजी तज्ञ डॉक्टरांनी दिली असून आमच्या प्रतिनिधींनी याबाबत घेतलेला आढावा.