पेट्रोलपंप व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करणारे आरोपी जेरबंद
Anchor:- मुर्तिजापूर येथील व्यावसायिक दिनेश भगवानदास बुब राष्ट्रीय महामार्गावरील नायरा पेट्रोलपंप येथून आपल्या चारचाकी गाडीत पेट्रोल पंपावरील रोख ३ लाख घेऊन मुर्तिजापूरकडे निघाले होते.यावेळी अज्ञात भामट्यांनी हिंदू स्मशानभूमीजवळ गाडी अडवून व्यवसायिकावर तीक्ष्ण हत्याराचे वार करून गंभीर जखमी केले.तसेच त्यांच्याजवळ असलेली रोख घेऊन पसार झाले होते.याप्रकरणी पोलिसांनी गतीने तपासाची चक्रे फिरवित काही तासातच दोन अल्पवयीनसह तीन आरोपींना गजाआड केले.
Vo:- या घटनेचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक बच्चन सिंह,अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शेळके तसेच सायबर विभागाचे गोपाल ठोंबरे,शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश सुर्यवंशी,डिबी पथकाचे हेड पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पांडे,सचिन दांदळे,मंगेश विल्हेकर,नंदकिशोर टिकार,पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे,गजानन खेडकर,स्वप्नील खाडे,भूषण नेमाडे हे रात्रीपासून आरोपींचा सुगावा घेण्याकरिता परिसर पिंजून काढीत असता मिळालेल्या गुप्त माहितीवरून अमरावती येथून रात्री उशिरा दोन अल्पवयीन आरोपींसह तीन जणांना अटक केली. त्यांची विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तर देत असता त्यांना पोलिसी हिसका दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली.आरोपी अनिकेत राजकुमार वरघट(२४) ऑटो चालक रा.अमरावती,सम्यक धनराज थोरात(२०) रा.वडाली प्रबुद्ध नगर अमरावती,पवन उमेश दहिहांडेकर(१९) रा.श्रीराम नगर मुर्तिजापूर तसेच वडाली कॅम्प अमरावती व प्रबुद्ध नगर अमरावती येथील राहणारे दोन अल्पवयीन आहेत.आरोपीजवळून १ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींजवळून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी किंमत ५० हजार मोबाईल किंमत ७० हजार व रोख ३१ हजार असा १ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यापूर्वी सुद्धा येथील व्यवसायी राजेश गुप्ता यांची दुचाकी अडवून त्यांच्याजवळील रोख घेऊन अज्ञात भामटे पसार झाल्याची घटना घडली होती.सदर घटने मध्ये सुद्धा याच आरोपींचा सहभाग असल्याची शंका व्यक्त होत असून,पोलीस तपास करीत आहेत.पुढील तपास ठाणेदार भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस उपनिरीक्षक अनंत वडतकर करीत आहेत. मनोहर दाभाडे (उपविभागीय पोलीस अधिकारी)विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News