पहिल्याच पावसात नगर परिषदेचा ढिसाळपणा आला समोर..!
अकोला :- जिल्ह्यातील
मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रांतर्गत नुकतीच मान्सूनपूर्व नियोजनाची कामे करण्यात आली. परंतु ठिकठिकाणचे बांधकाम व्यवस्थित न झाल्याने नगर परीषदेचे नियोजन अगदी ढिसाळ असल्याचे स्पष्ट झाले. पहिल्याच पावसात नालीतील पाणी रस्त्यावर व दुकानात शिरल्याने नियोजनाच्या ढिसाळपणावर शिक्कामोर्तब झाले आहे.
येथील जळमकर इंडस्ट्रीज ते शहर पोलीस स्टेशन लाईन च्या रस्त्यालगत नगर परिषदेने नाली बांधण्यात आलीये परंतु सदर नालीच्या बांधकामात नालीला उतारच काढला नसल्याने पावसामुळे नालीचे पाणी सर्व रस्त्यावर व लगतच असलेल्या नगर परिषदेचे दुकानां मध्ये शिरल्याने येथील व्यवसाईकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्यावर चालणे देखील कठीण झाले आहे. पहिलाच पाऊस येताच नालितील गाळ रस्त्यावर व येथील दुकानां मध्ये आलाय. यामुळे मात्र येथील रस्त्यांवर व दुकानांमध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. या बाबत येथील दुकानदारांनी नगर परिषदेस वारंवार तक्रार देऊनही या कडे नगर परिषदेने दुर्लक्ष करीत कुठलाही तोडगा न काढल्याने आज आम्हास नुकसान सहन करावी लागत असून यामुळे मात्र नगर परिषदेच्या बांधकाम विभागाचे ढिसाळपणा दिसून येत असल्याचे येथील व्यवसाईकांकडून सांगितल्या जात आहे. नगर परिषदेच्या बांधकाम विभागाने अथवा अभियंतानी नाली बांधकामावर वेळीच लक्ष दिले असते तर पावसाळ्यात उद्भवणाऱ्या समस्या वेळीच निकाली लागल्या असत्या परंतु नगर परिषदेच्या अभियंतांच्या कामचुकारपणामुळे मात्र नगर परिषदेच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. या गांभीर्याकडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक एस. एस टाले आता काय कारवाई करतात व येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्यात कितपत यश प्राप्त करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
———————————-
विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.