ऑर्बिट बाल रुग्णालयाच्या हलगर्जी पणाने समर मृत्यू..!
———————————-
अकोला :- ऑर्बिट बाल रुग्णालयामध्ये भांबेरी च्या समर संदीप भोजने या १० वर्ष्याच्या बाळाचा रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घटना घडलीये.
समर संदीप भोजने या बालकावर ११ जून पासून अकोला येथील ऑर्बिट बाल रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु डॉक्टरांऐवजी नर्सिंग स्टाफच्या भरोशावर ऑर्बिट हॉस्पिटल चे काम चालविले जात असल्यानेच डॉक्टरांच्या व नर्सिंग स्टाफ च्या हलगर्जीपणामुळे आमच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा दावा संदीप भोजने रा भांबोरी ता. तेल्हारा यांनी केला आहे.
मात्र या बाबत ऑर्बिट हॉस्पिटलच्या प्रशासनाने या विषयी त्यांचे कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. सोमवारी रात्री च्या सुमारास सदर घटना घडलीये. भोजने परिवाराने समरला परत द्या नाहीतर हॉस्पिटल ला लॉक लावा असे म्हणत हॉस्पिटलमध्येच ठिय्या मांडला होता. या नंतर हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने सिव्हिल लाईन पोलिसांना बोलवण्याची माहिती आहे. समर्थ मृत्यूला केवळ हॉस्पिटल प्रशासन व डॉक्टर यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा दावा यावेळी नातेवाईकां कडून रेटून धरण्यात आला. तर ऑर्बिट हॉस्पिटल मध्ये उपचारादरम्यान लहान मुलांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांकडून सांगितल्या जात आहे. यापूर्वीही अशीच घटना घडल्याचेही बोलल्या जात असून अतिशय हालाखीच्या परिस्थितीत असलेले संदीप भोजने यांनी कर्जबाजारी होत, आपले शेत गहाण ठेवत समर वर हार्दिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू केले होते. त्यांना आपला मुलगा ठीक होईल अशी ही आशा होती. मात्र ही त्यांची आशा डॉक्टरांच्या निष्काळाचीपणामुळे निराशा च ठरली. रात्रीच्या सुमारास हॉस्पिटलमध्येच समरची अचानक तब्येत खराब झाली आणि त्याचा जीव गेला हा सर्व प्रकार गंभीर असून ऑर्बिट हॉस्पिटल प्रशासनाची चूक असल्याचा आरोप समरचे आजोबा दादाराव वानखडे यांनी केला आहे.
कार्बिट हॉस्पिटलच्या डॉक्टर गेले तरी कुठे असा प्रश्न या निमित्त समोर येत असून गेल्या काही महिन्यांपूर्वी अशा प्रकारचा हलगर्जीपणाचा आरोप एका परिवाराने लावला होता. त्यामुळे ऑर्बिट हॉस्पिटलचे कुठे काही चुकत आहे का..? याची उच्चस्तरीय चौकशी होण्याची मागणी सर्व दुरून होत आहे.
———————————-
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतीक कुऱ्हेकर CEN News अकोला.