मनसे कडुन पाथर्ली रस्त्याच्या कॅांक्रीटीकरणाच्या कामाची केली पाहणी
येत्या सोमवारपासून बहुतांश सर्व शाळा सुरु होत आहेत.पाथर्ली रस्त्याचा शेलार नाका ते शंकर मंदिर ह्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु आहे.याच रस्त्यावर आचार्य भिसे शाळा देखील आहे.ही शाळा सुद्धा सोमवार १६ जून पासुन सुरु होत आहेत.
शाळेचे शिक्षक तसेच स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर आज मनसेचे माजी नगरसेवक मनोज प्रकाश घरत यांनी सदर कामांची पाहणी केली असता सदर कामात अनेक त्रुटी आढळून आल्या.कंत्राटदाराला बोलावून सर्व गोष्टी त्यांना दाखवण्यात आल्या.
कॅाक्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या दुतर्फा असलेले खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत त्यामुळे अपघात होत आहेत.
अनेक ठिकाणी कलव्हर्ट ची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत तिथे सुद्धा अपघात झाले आहेत.
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली नाही.
शाळा सुरु झाल्यावर शालेय बसेस मोठ्या प्रमाणावर या रस्त्याने ये जा करत असतात हा रस्ता बंद असेल तर पाथर्ली गावातील अरुंद रस्त्याने बसेसची वाहतूक करणे शक्य होणार नाही वाहतुकीचा खोळंबा होऊन शालेय विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होऊ शकतो.
त्यामुळे सदरची सर्व कामे रविवार पर्यंत पुर्ण करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी सूचना मनसे माजी नगरसेवक मनोज प्रकाश घरत यांनी कंत्राटदाराला केली.
सदर प्रसंगी मनसे विभागअध्यक्ष रविंद्र गरुड,भाजपा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे व स्थानिक रहिवासी उपस्थित होते.