मतदाराचा वाढता पाठींबा हाच आमचा विजय, रवी राठी..
—————————————-
मूर्तिजापूर :- सत्तेत असो वा नसो कायम दिव्यांग, शेतकरी यांच्या प्रश्नासाठी लढणारे दबंग प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चुभाऊ कडू यांची स्वच्छ प्रतिमा हीच आमच्या साठी जमेची बाजू असल्याने आम्हाला लोकांचा पाठिंबा मिळत आहे. त्याचबरोबर आम्ही विजयी होऊ असा विश्वास प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार रवी राठी यांनी मूर्तिजापूर येथे आयोजित जाहीर सभेत व्यक्त केला.
मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग स्थित असलेल्या बियाणी जिन येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चूभाऊ कडू यांची प्रचार सभा जाहीर करण्यात आली होती. आमदार बच्चू कडू यांना घेऊन येणाऱ्या हेलिकॉप्टर मध्ये वेळेवरच काही तांत्रिक बिघाड आल्याने ते सभेत स्थळी पोहचू शकले नाही , परंतु बच्चू कडू यांनी भ्रमणध्वनी वरून सभेला संबोधित करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार रवी राठी यांना मुर्तीजापुर मतदार संघात सेवा करण्याची संधी देऊन येणाऱ्या २० तारखेला रवि राठी यांना मतदान करून निवडून देण्याचे आवाहन केले.
यावेळी उमेदवार रवी राठी यांनी विद्यमान आमदार हरीष पिंपळे यांच्यावर चौफेर हल्ला चढवत राज ठाकरे यांच्या स्टाईल मध्ये “लाव रे तो व्हिडिओ” म्हणत आमदार हरीष पिंपळे यांच्या भाषणाची क्लिप जनसमुदाया समोर ठेवली.
यावेळी सभेला हिंदू मातंग सेना संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब सोनोने, प्रहार च्या महिला जिल्ह्याध्यक्षा शिल्पा बाजड, अरविंद पाटील, सुरेश जोगळे, मोईन अली, बिट्टू वाकोडे, विवेक बांबल, अक्षय वैराळे, विठ्ठल फुंडकर, सागर फुंडकर आदी प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.