विदेशी चलनाचे हेराफेरी करून लुबाडणाऱ्या टोळीस पोलिसांनी केले जेरबंद…!
मुर्तिजापूर:- येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोड वरील एका घरातून विदेशी चलनाची हेराफेरी करून लुबाडणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले.
पश्चिम बंगाल,बिहार,दिल्ली,कर्नाटक आदी परप्रांतातून महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यात विदेशी चलनाचे हेराफेरी करून लुबाडणाऱ्या टोळी मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरुन अमरावती स्थानिक गुन्हे शाखा पथक व वाशिम जिल्ह्यातील कारंजा पोलिसांनी मंगळवार दि.३० रोजी दुपारच्या सुमारास मुर्तिजापूर येथील स्टेशन विभाग परिसरातील चिखली गेट रोड स्थित राहणाऱ्या शेख अशपाक शेख वजीर यांच्या घरात टाकलेल्या छाप्यात तीन लाख रुपयांचे विदेशी चलन जप्त करत दोन पुरुष व तीन महिलांना अटक केली.सदर कारवाई मध्ये अमरावती स्थानिक गुन्हे शाखाने तीन महिलासह जप्त केलेली रोकड दर्यापुर पोलिसांच्या स्वाधीन केले.तर इतर दोन पुरुष आरोपींना कारंजा पोलिसांनी पुढील तपासा करिता अटक करण्यात आली.सदर प्रकरणात परप्रांतीयांचे १२ महिला व पुरुषाची गॅंग असून त्यात तीन महिला व इतर पुरुष असल्याचे यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले.
गेल्या अनेक दिवसांपासून मुर्तिजापूर शहरात परप्रांतातून आलेल्या पुरुष व महिलांचे वास्तव्य असून संशयास्पद असल्याचे गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली यावरून अमरावती स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई केली.सदर प्रकरणातील सात आरोपींचा युद्ध पातळीवर शोध सुरू असून मुख्य सुत्रधार फिरोज हा अद्यापही फरार आहे.कारंजा पोलीस तपास कामी पंचशील वाडी येथील एका घरात वास्तव्यास असलेल्या परप्रांतीयांची माहिती घेतली.तर सदर प्रकरणात मुर्तिजापूर येथे स्टेशन विभाग परिसरातील वास्तव्यास असलेले शेख अशपाक शेख वजीर यांच्या घरी मिळालेल्या विदेशी रोकड व आरोपीचा तर काही संबंध नाही ना ? अश्या विविध प्रश्नांना शहरात उधाण आले आहे.विशेष म्हणजे संपूर्ण प्रकरणात मुर्तिजापूर पोलीस हे अनभिज्ञ होते. प्रकरणाचा पुढील तपास अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व कारंजा शहर पोलीसचे पोलीस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला,पोलीस उपनिरीक्षक वसंत ठाकरे, हवालदार संतोष पाईकराव,गणेश जाधव,मयुरेश तिवारी,उमेश बिंबेकर,शेरू गारवे, खोलेश्वर खोपसे तपास कामी होते.
__________________________________
कॅमेरामन शाम वाळस्कर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.