#थॅलेसेमिया सारख्या गंभीर अनुवंशिक रक्तविकाराविषयी जनजागृती निर्माण करण्याचा व्यापक प्रयत्न करण्यात येत असून प्रभावी उपचारपद्धतींद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
‘आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिना’निमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाला.
शासनाचा हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता, तो समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारे एक
महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी व्यक्त केला.