लुप्त होत चाललाय भुलाबाई उत्सव: आजची पिढी झाली अनभिज्ञ
मुखोद्गत असलेली गाणी, भूराबाईच्या सणाचा पडला विसर
————–
काही वर्षांत होणार भुलाबाईचा सण कालबाह्य
अकोला
परंपरागत चालत आलेला भूराबाईच्या सणाचा नव्या पिढीला विसर पडला असल्याने भाद्रपद महिन्यात महिनाभर चालणारा हा सण आता लुप्त होत चालल्याने येणाऱ्या पिढीला या सणाच्या संस्कृती विषयी कुठलीच माहिती नसल्याने या सणाचे महत्त्व संपुष्टात येणार आहे.
भुलाबाईच्या उत्सवाला ‘भोंडला’ या पारंपरिक नावाने संबोधले जाते भाद्रपद महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी भुलाबाई पारंपरिक पद्धतीने विराजमान होतात त्या दिवसापासून कोजागिरी पौर्णिमा अर्थात माळीच्या दिवसापर्यंत माहेरी आलेल्या भुलाबाईची एक महिना चालणाऱ्या उत्सवाची पाठवणी करुन समाप्ती होते. विदर्भासह खांदेश व आजूबाजूच्या परिसरात हा उत्सव मोठ्या ऐटीत साजरा केला जातो परंतु कालांतराने या उत्सवाचे महत्त्व कमी झाल्याचे निदर्शनास येते, घरोघरी चालत आलेला भूराबाईच्या सणाचा अनन्यसाधारण महत्व होते, महिनाभर रोज संध्याकाळी भुलाबाईच्या गाण्यांचा आवाज कानी पाडायचा, ग्रामीण भागात शाळा सुटल्यावर रोज संध्याकाळी मुलींच्या झुंडा घरोघरी गाणे म्हणण्यासाठी जाताना दिसायच्या, रोज प्रसाद रुपात वेगवेगळ्या ‘खाऊ’ मेजवानी असायची परंतु या सगळ्या गोष्टी कालबाह्य होताना दिसतात. भुलाबाई ही महाराष्ट्रातील एक देवी असून भिल्लीनीचा वेश घेऊन भिल्लरुपी शंकराला भुलवायला आलेल्या पार्वतीला भुलाबाई असे म्हणतात, शंकर म्हणजे भुलोबा आणि पार्वती म्हणजे भुलाबाई असल्याची आख्यायिका आहे. हा उत्सव हल्ली लुप्त होत चालला आहे तर त्यांची मुखोद्गत असलेली गाणी आताची पिढी विसरली असल्याने, हा उत्सव बंद होण्याच्या मार्गावर आहे.
—————
बाईट :- पल्लवी धनोकार, गृहिणी
———————————
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News मूर्तिजापूर -अकोला.