नववर्षाचा पहिला दिवस #गडचिरोली जिल्ह्यासाठी विकासाची नवीन पहाट घेऊन आला असून विकासाच्या, सामाजिक सलोख्याच्या, शांततेच्या आणि औद्योगिकीकरणाच्या दिशेने गडचिरोलीची वाटचाल सुरु राहील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
नवीन वर्षाचा पहिला दिवस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी #गडचिरोली जिल्ह्यात व्यतीत केला. त्यांच्या उपस्थितीत जहाल नक्षली ताराक्कासह 11 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली.