रेल्वेच्या सिग्नल प्रणालीत वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या ताराची चोरी करणारे आरोपी जेर बंद..!
रेल्वे सुरक्षा बल मुर्तीजापुर ची यशस्वी कामगिरी..
—————————————-
मूर्तिजापूर :- येथील रेल्वे सुरक्षा बल पथकाच्या वतीने रेल्वे सिग्नल प्रणाली मध्ये वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या चोरट्यांना जेर बंद करून रेल्वे अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.
मूर्तिजापूर ते माना रेल्वे स्थाणका दरम्यान असलेल्या आय. बी. एस सिग्नल प्रणाली रूम मधील काही दिवसांपूर्वी सिग्नल प्रणाली मध्ये वापरण्यात येत असलेले तांब्याच्या तारांची (वायर) ची मोठ्या चोरी घडल्याची घटना घडली.
या वरून रेल्वे सुरक्षा बल (RPF) ठाणे मूर्तिजापूर येथे रेल्वे मालमत्ता चोरी केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला व चोरांचा तपास रेल्वे सुरक्षा बल चे निरीक्षक सुनील कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सुनील डोंगरे, सहा. उपनिरीक्षक एस. एन रॉय करीत असतांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरून चोरट्यांनी एका ठिकाणी रेल्वे सिग्नल मध्ये वापरण्यात येणाऱ्या तांब्याच्या वायर ची एका व्यवसायिकाने खरेदी केल्याचे समजताच तिथे जाऊन शहानशा करून सदर खरेदी केलेले ६५०० रुपयांचे तांब्याच्या वायर हे रेल्वे lचेच असल्याचे आढळून आले या वरून आरोपी विजय मधुकर शेंडे वय २३ वर्ष रा. धोत्रा शिंदे, रोहित नाना बोबडे वय १७ वर्ष रा. सिद्धार्थ नगर स्टेशन विभाग मुर्तीजापुर. व मुद्देमाल विकत घेणारा व्यवसायिक मोसीम खान वय ४३ वर्ष रा. जुनी वस्ती मूर्तिजापूर यांच्या विरुद्ध RP(UP) अॅक्ट ३(A) व रेल्वे अधिनियम कलम १७४, १४७ अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीस अटक करण्यात आली.
पुढील तपास रेल्वे सुरक्षा बल (RPF) मूर्तिजापूर चे निरीक्षक सुनील कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक सुनील डोंगरे, सहा उपनिरीक्षक एस. एन रॉय, आरक्षक प्रमोद ढोले, भगवान साबळे, संदीप तायडे, मुकुंद खवले, सुमित क्रिपाल, अविनाश मढावी, शैलेश वरघट,अजय राणे, अमित बारापात्रे,योगेश ठाकरे, वाहिद खान, जे. पी. माने करीत आहे.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.
