सुलतानपूर येथे अखंड हरीनाम सप्ताह उत्साहात ..!
मूर्तिजापूर :- तालुक्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान सुलतानपूर येथे श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.
. मूर्तिजापूर शहरापासून अवघ्या ७ किलोमीटर अंतरावर असलेल्या सुलतानपूर येथे श्री संत तुकाराम महाराज बीज उत्सव व अखंड हरिनाम सप्ताह निमित्य विविध धार्मिक कार्यक्रम दि. १६ मार्च ते २२ मार्च दरम्यान मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न होत असून यामध्ये सकाळी ६ ते ७ काकड आरती, सकाळी १० ते १२ व ३ ते ५ भागवत कथा वाचन, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ व रात्री ९ ते ११ हरी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह दरम्यान ह. भ. प शिवाजी महाराज मानकर आळंदीकर, ह. भ. प पंढरी महाराज डिगोळे जवळा पळसखेड, ह. भ. प सोपान महाराज काळबांडे आळंदीकर, ह. भ. प विनोदाचार्य त्र्यंबक महाराज आवारे सोनबर्डी, ह.भ. प गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाघ ज्ञानेश आश्रम वारी ( भैरवगड ), ह. भ. प विनोदाचार्य अरुण महाराज लांडे पारस, ह. भ. प सुनील महाराज राहणे कार्ली आश्रम व ह. भ. प गुरुवर्य सोपान काका शास्त्री कुचे अमरावती यांचे काल्याचे किर्तन तसेच दि १६ मार्च ते २३ मार्च दरम्यान सकाळ व संध्याकाळ दोन्ही वेळेस महाप्रसादाचे आयोजन विविध भक्तांच्या वतीने करण्यात आले असून या सप्ताह दरम्यान मुर्तीजापुर तालुक्याच्या पंचक्रोशीतील भजनी मंडळ यांचे आयोजन तर शनिवार २२ रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.