रेल्वेत गमावलेले परत मिळाले..!
—————————————-
लोहमार्ग पोलिसांची यशस्वी कामगिरी..
—————————————-
मुंबई :- लोकल, एक्सप्रेस किंवा स्टेशनवर प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणाऱ्यांना शोधून मुद्देमाल संबंधितांना परत करण्याची कामगिरी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (GRP) लोहमार्ग पोलिसांनी पार पाडली.
त्यांच्या या कामगिरीचे प्रवाशांनी कौतुक करीत आभार व्यक्त केले.
सुमारे १४ जणांना त्यांचा सुमारे ८ ते ९ लाखांचा चोरीस गेलेला ऐवज समारंभपूर्वक बुधवारी परत करण्यात आला.पै-पै गोळा करून दागिने घेतलेल्या मोलकरणीपासून ते नोकरदार-व्यावसायिकांना रेल्वे स्टेशनवर चोरांकडून हात दाखवला जातो. रेल्वे प्रवासादरम्यान वा स्टेशनवर चोरट्यांकडून दागिन्यांबरोबरीने पैसे, मोबाईल, लॅपटॉप आदी मौल्यवान वस्तू चोरले जातात. अशा चोरट्यांना पकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचे कार्य रेल्वे पोलिसांकडून केले जाते. गेल्या वर्षभरात अशाप्रकारे छडा लावलेल्या प्रकरणांतील मुद्देमाल परत करण्याचा कार्यक्रम रेझिंग डे सप्ताह च्या अनुषंगाने प्रातिनिधिक स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिसांतर्फे लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिसवे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात घेण्यात आला.
यावेळी उपस्थित फिर्यादी व पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त करीत पोलिसांच्या कार्याचे कौतुक करून आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोहमार्ग पोलीस चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात चोरट्यांचा छडा लावण्यात यशस्वी कामगिरी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक सांगळे, महिला उपनिरीक्षक मढकट्टे, चव्हाण, तायडे, मल्लिकार्जुन बिराजदार,महिला पोलीस रेश्मा घोडे यांचे कौतुक करण्यात आले.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News मुंबई.