मूर्तिजापूरात रेल्वे थांबा करिता सत्ताधारी भाजप आमदारावर आंदोलनाची वेळ..!
सत्ताधारी आमदारानेच शासना विरुद्ध थोटावला दंड..
—————————————-
मूर्तिजापूर :- उन्हाळ्याचे चटके चांगलेच जाणवत असतांना मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर विविध गाड्यांचा थांबा मिळावा या करिता चक्क सत्ताधारी आमदार हरिष पिंपळे व भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष रितेश सबाजकर यांच्या पुढाकारणे येत्या २ एप्रिल रोजी रेल रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने “सत्ताधारी भाजप आमदारावरच आंदोलनाची वेळ आल्याने ” राजकीय वर्तुळच चांगलीच चर्चा तापलीये.
. मूर्तिजापूर रेल्वे स्थणकवरून नितत्याने मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद, सुरत आदी ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाश्यांची वर्दळ कायम असते. तर या स्थाणका वरून वाशिम, कारंजा, दारव्हा, दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर सह आजूबाजूच्या ग्रामीण भागातील प्रवाशी येथूनच आपल्या प्रवासाला सुरवात करतात मात्र स्वातंत्र्य काळा पासून ज्या गाड्यांचे थांबे या स्थानकावर देण्यात आले आहेत. त्यात कुठलाही तूर्तास बदल न होत असल्याने येत्या २ एप्रिल रोजी भाजपा चे आमदार हरिष पिंपळे व भाजपा चे मूर्तिजापूर शहराध्यक्ष रितेश सबाजकर यांच्या पुढाकारणे भारतीय जनता पार्टी च्या वतीने मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर……… या पाच गाड्यांचा थांबा मिळावा या करिता सकाळी १० वाजता रेल रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा एका निवेदनाद्वारे रेल्वे प्रशासनास देण्यात आला आहे. मात्र केंद्रात व राज्यात भाजपा ची सत्ता असतांना देखील सत्ताधारी पक्षाच्या आमदारावर आंदोलन करण्याची वेळ आल्याने राजकीय वर्तुळात व शहरात विविध चर्चेला उधाण आले आहे.
आमदार हरिष पिंपळे हे विधी मंडळात प्रश्न मांडतांना आक्रमक असतात या करिता प्रसिद्ध असतांना आता चक्क सत्ताधारी आमदारानेच शासनाविरुद्ध तोटाविला दंड. अश्या विविध चर्चा शहरात रंगतांना दिसत आहे. तर येण्याऱ्या २ एप्रिल रोजी देण्यात आलेल्या रेल रोको बाबत रेल्वे प्रशासन ही सज्ज झाले असून रेल्वे प्रशासनाच्या वतीने हालचालीला वेग आल्याचे समजले जात आहे.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.