‘श्रीं’च्या १४७ व्या प्रगटदिनी भक्तांची मांदियाळी..
लाखो भाविकांनी घेतले समाधीदर्शन..
श्री संस्थानचे उत्तम नियोजनाची सर्वत्र चर्चा..
शेगाव (प्रतिनिधी) श्री संस्थानद्वारे ‘श्रीं’चा १४७वा प्रगटदिन उत्सव धार्मिक प्रथा परंपरेनुसार पार पडला. आज प्रगट दिनी २० फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता यागाची पुर्णाहूती झाली. तसेच ‘श्रीं’च्या प्रगटनिमित्त श्रीहरी कीर्तन होवून कार्यक्रम संपन्न झाला.
यावर्षी श्री प्रगटदिन उत्सवात श्रींचे सेवेत १००१ दिंड्यांनी सहभाग घेतला. यापैकी नियमांची पूर्तता केलेल्या एकूण १०९ नवीन दीड्यांना १० टाळ, १ विणा, १ मृदंग, श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम गाथा, श्री एकनाथी भागवत असे संत वाङ्मय आणि श्री माऊली पताका वितरित करण्यात आल्या. जुन्या दिंड्यांना भजनी साहित्य दुरूस्ती करिता नियमाप्रमाणे सानुग्रह अंशदान व इतर व्यवस्थेकरिता सहयोग देण्यात आला. तसेच उत्सवानिमित्त आलेल्या भजनी दिंड्यांमधील वारकऱ्यांची भोजन प्रसादाची व्यवस्था तसेच प्रथमोपचार केंद्राची सुविधा विसावा संकूल येथे करण्यात आली.
तसेच उत्सव काळात शेगावसह, श्री क्षेत्र पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर, पंपासरोवर, ओंकारेश्वर, गिरडा अशा सर्व शाखांवर श्रींचा प्रगटदिन उत्सव संपन्न होऊन २,३०,००० भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले, अशारितीने श्री कृपेने वारकऱ्यांची व भाविकांची सेवा घडून आली आहे.
या उत्सादरम्यान आमच्या पद्धतीने श्रींच्या भक्तांची संवाद साधला.
जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख CEN News शेगाव -बुलढाणा.