सामाजिक कार्यातून नमो नमो मित्र परिवाराची छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी…!
हर्षल साबळे यांनी आपल्या मित्रपरिवारांसह केले शालेय साहित्यांचे वाटप
मूर्तिजापूरः- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त हर्षल साबळे मित्रपरिवार व ‘नमो नमो मित्र परिवारा तर्फे संत गुणवंत महाराज मतिमंद विद्यालय व स्व. एम.एस.निवासी मूकबधिर विद्यालयात विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल माहिती सांगत मुलांना शालेय साहित्य देण्यात आले. नमो नमो मित्र परिवाराचे अध्यक्ष हर्षल साबळे, भूषण भढांगे, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब खांडेकर मुख्याध्यापक ऋषिकेश खांडेकर, पंकज वानखडे, गजानन चौधरी, खुशाल ठोकळ, अनुप गावंडे, आकाश अग्रवाल, सार्थक साबळे, अभिनय मुळे, स्वप्नील शिवरकर, अमन वानखडे, सक्षम गावंडे, संस्थेचे कर्मचारी रितेश खांडेकर, इलियास शेख, अनिल शिरसाठ, प्रेम खेडकर, कमलेश नवले, कविता मॅडम उपस्थित होत्या.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला