शिवसेना ऊ. बा. ठा. पक्षा तर्फे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या प्रमुख पदी नेते उपनेत्यांची निवड, धुळ्यातून शुभांगी ताई पाटील यांना जबाबदारी.
आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रमुख म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे नेते उपनेत्यांची निवड करण्यात आली त्यामध्ये धुळ्यातून शिवसेना उपनेते शुभांगी ताई पाटील यांना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
मा. ना. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने देखील या निवडणुकांसाठी कंबर कसली असून पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर या निवडणुकांबाबत पक्षप्रमुख मा उद्धव ठाकरे साहेब, पक्षाचे नेते खा.संजय राऊत साहेब, ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुभाष देसाई साहेब व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची दिनांक 17/05/2025 रोजी या निवडणुकां संदर्भात सर्व नेते, राज्य उपनेते व जिल्हाप्रमुख यांची बैठक शिवसेना भवन मुंबई येथे घेण्यात आली होती.
या बैठकीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत धुळे जिल्ह्यातून जिल्ह्याचे प्रमुख म्हणून शिवसेनेच्या राज्य उपनेते शुभांगी ताई पाटील तसेच शिवसेना उपनेते तथा धुळे जिल्हा संपर्कप्रमुख माजी आ.अशोक धात्रक साहेब व नाशिक जिल्ह्याचे शिवसेना उपनेते अद्वय आबा हिरे यांना धुळे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे नेते व उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख माननीय खासदार संजय राऊत साहेब, पक्षाचे नेते मा अनिल परब साहेब यांच्या नेतृत्वाखाली सदर त्रिसदस्यीय टीम स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी धुळे जिल्ह्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडणार आहे.