अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेनेच्या तालुकाध्यक्षपदी शाम वाळसकर यांची निवड…!
मूर्तिजापूर :- अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाच्या मूर्तिजापूर तालुकाध्यक्षपदी शाम कैलास वाळसकर यांची निवड करण्यात आले आहे. नुकतेच त्यांना जिल्हाध्यक्ष रवी घणबहादूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची विचारसरणी ला अनुसरून शिवसेना(शिंदे गट)चे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिवसेनेचे ध्येयधोरणे, विचार सर्व सामान्य माणसांपर्यंत पोहोचून अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाच्या माध्यमातून उद्योजकांना चालना मिळावी व पक्ष संघटन बळकट करण्याच्या करून प्रत्येकाच्या घराघरापर्यंत उद्योजकाच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्य पोहोचावे असे यावेळी अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष रवी घनबहादूर बोलत होते.
सदर नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमाच्या वेळी जिल्हाध्यक्ष रवी घनबहादुर, जिल्हा उपाध्यक्ष मयूर चावडा, राजेश अग्रवाल, आशिष बिलाखिया, सुरेश राठोड, जिल्हा चिटणीस सागर भिसे, राजेश तायडे, मुर्तीजापुर तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे, संजय तिवारी, गजानन मरोडकर आदी शिवसेना(शिंदे गट) तथा अखिल भारतीय शिव उद्योग सहकार महासंघाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
____________
विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.