रवी राठी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राम राम..!
___________
रवी राठी भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात
___________
अकोला जिल्हातील एकमेव मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून आगामी होऊघातलेल्या विधानसभा निवडणुकी मध्ये या मतदार संघाची चर्चा राज्यात गाजत असतांनाच गेल्या २०१९ च्या निवडणुकीत ४२ हजार मत घेऊन पराभव झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाचे प्रदेश संघटन सचिव रवी राठी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प) ला राम राम (राजीनामा) दिल्याने आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका सहन करावा लागणार असल्याचे चित्र समोर आले आहे.
रवी राठी हे गेल्या १० वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प) चे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने शेतकरी आंदोलन, महागाई विरोधात आवाज उचललाय त्यांनी पक्षात प्रदेश संघटन सचिव सह विविध पद मोठ्या सक्रियतेने पार पाडली आहे. २०१९ मध्ये मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघातून ४२ हजार मत घेऊन पराभव झाल्यानंतर ही रवी राठी यांनी हार न पतकारिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ला बळकट करण्याकरीता त्यांचे मोठे मोलाचे कार्य मानल्या जाते.
महाविकास आघाडी सरकार असताना सरकारची बाजू मांडणे, तर सरकार गेल्यावरही विरोधी पक्षाची बाजू त्यांनी मोठ्या चालाखीने पार पाडली. मूर्तिजापूर -बार्शीटाकळी तील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प) गटाला जिवंत ठेवण्यात रवी राठी यांचा मोठा सिंहाचा वाटा असून २०२४ च्या विधानसभा मध्ये ते इच्छुक उमेदवार असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गटाने त्यांना डावलून सम्राट डोंगरदिवे यांना उमेदवारी दिल्याने नाराज झालेल्या रवि राठी यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राम राम दिल्याने याचा फटका आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला सोसावा लागेल हे मात्र निश्चित च…
___________
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.