राहुल कांबळे नवी मुंबई : नवी मुंबई लोकलच्या प्रवासा दरम्यान जाणवलेल्या सुरक्षेच्या समस्या नवी मुंबई रेल्वे पोलिस दलातील महिला पोलिस अंमलदारांना आपल्याच मैत्रिणी असल्याचं समजून व्यक्त करण्याचे आवाहन या मोहिमेद्वारे करण्यात आले आहे.
खाकीतील सखी या अनोख्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी केवळ महिलांसाठी तयार केलेले आणि सामाजिक समुदाय व्यासपीठ असलेले कोटो अॅप हे आता मुंबई रेल्वे पोलिसांबरोबर संयुक्तरीत्या काम करणार आहे. मुंबई रेल्वे पोलिस दलातील महिला अंमलदार यांना महिला रेल्वे प्रवाशांनी त्यांच्या ‘सखी’ (मैत्रीण) असे गृहीत धरून लोकल ट्रेनमधून प्रवास करताना त्यांच्या सुरक्षेसंबंधीत भेडसवणारे प्रश्न/ अनुचित, अप्रिय अनुभव या बाबत रेल्वे पोलीसांकडे व्यक्त होणे हा मुख्य उद्देश आहे.
तसेच १५१२ या हेल्प लाईन वर सुद्धा आपल्याला तत्काळ मदत होईल.
या उपक्रमाचा भाग म्हणून नवी मुंबई शहरातील महिलांना रेल्वे प्रवाशांचे नवी मुंबई रेल्वे पोलिसांच्या महिला अंमलदार यांचे समवेत मुक्त आणि सुरक्षित अभिवचन प्रस्थापित व्हावे यासाठी कोटो महिला सुरक्षा समुदाय, खाकीतील सखी या उपक्रमाला पाठिंबा देणार आहे. महिला प्रवासी त्यांच्या लोकल प्रवासादरम्यान येणाऱ्या कोणत्याही समस्यांची तक्रार करण्यासाठी कोटो समुदाय अॅप वापरू शकतात. ते त्यांच्या समस्यांबद्दल फोटो, व्हिडिओ आणि संदेश पोस्ट करू शकतात आणि रेल्वे पोलिस त्याप्रमाणे त्वरित कारवाई त्यांना असे वाशी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
बाईट:वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाशी रेल्वे पोलीस स्टेशन
संभाजी कटारे