फेरीवाल्यांच्या पूनर्वसनाकडे केडीएमसी अक्षम्य दुर्लक्ष
शिवसेना ठाकरे गटाकडून उपोषण सुरु
हे आंदोलन तीव्र होणार
जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांचा केडीएमसीला इशारा
Anc-डाेंबिवली पूर्वेला फेरीवाल्यांचे पूनर्वसन करणे अत्यंत गरजेचे असताना. प्रशासनाने वारंवार दिशाभूल करुन कोणतीही कारवाई केलेली नाही. प्रशासनाचा निषेध करतो. येत्या दोन दिवसात प्रशासनात काेणतीही कारवाई केली नाही तर शिवसेना ठाकर गटाकडून सुरु असलेले आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.
फेरीवाल्यांच्या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गटाकडून डोंबिवली स्टेशन परिसरात शहर प्रमुख अभिजीत सावंत यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला जिल्हा प्रमुख म्हात्रे यांनी भेट दिली. त्यांनी सांगितले की, प्रशासनाने कोणाची व्यवस्था केली. मूळ फेरीवाल्यांची व्यवस्था केलेली नाही. त्यांच्या गटा तटाचे त्यांना पुरवठा करणाऱ्या फेरीवाल्यांची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. त्यांचीच दखल घेततात. इथे ३० ते ४० वर्षे बसणारे फेरीवाल्यांची त्यांची कुणी दखळ घेत नाही. गावातून येणाऱ्या महिला छोटीशी टोपली घेऊन येऊन फेरीचा व्यवसाय करतात. त्यांची बसण्याची जागा कोणी देत नाही. प्रशासनाने यावर तोडगा काढला नाही तर प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करणार असा इशारा म्हात्रे यांनी केडीएमसी प्रशासनाला दिला आहे.
बाईट- दीपेश म्हात्रे, जिल्हा प्रमुख, शिवसेना ठाकरे गट