नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय भटकर यांची मूर्तिजापूरात विविध ठिकाणी सदिच्छ भेट..!
मूर्तिजापूर :- येथील शिवाजी नगर येथील अखिल भटकर यांच्या निवास स्थानी संगणकाचे जनक तथा नालंदा विश्व् विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी सदिच्छ भेट देऊन आपल्या गावाच्या विकासा बाबत चर्चा केली.
. मूर्तिजापूर तालुक्याचे नाव जगाच्या पाठीवर इतिहासात नोंदविणारे सांगणका चे जनक तथा नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर हे दरवर्षी प्रमाणे प्रभू राम नवमी जन्मोत्सव करिता आपल्या मूळ मुरंबा या गावी येतात. या निमित्याने गावातील तथा तालुक्यातील नातेवाईकांसह आप्तेष्टांची गाठीभेटी घेतात. ६ एप्रिल रोजी मुरंबा येथील श्रीराम मंदिरात विधिवत पुजाअर्चा करून डॉ. विजय भटकर यांनी प्रभू श्रीरामांना शेतकऱ्यांच्या हितार्थ साकडे घातले. या वेळी कुलपती डॉ.विजय भटकर यांनी मुरंबा च्या सरपंच सौ. धनश्री अखिल भटकर यांच्या निवास स्थानि सदिच्छ भेट देऊन आपल्या गावाच्या विकासाबाबत चर्चा विनिमय केली. तर इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन येथे ही डॉ भटकर यांनी भेट देऊन बदलत्या शिक्षणक्रमाबाबत शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सौ. धनश्री अखिल भटकर व समाजसेवक अखिल भटकर यांच्या वतीने डॉ. विजय भटकर यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तर इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशनच्या मुख्याध्यापिका सौ. प्रणाली प्रविण भटकर यांनी शाळेच्या वतीने स्वागत केले. या वेळी शशिकलाबाई भटकर, अखिल पाटील भटकर, राजेंद्र भटकर व पांडुरंग भटकर उपस्थित होते.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.