मूर्तिजापूर शहरात ठिक-ठिकाणी ३९५ वी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात…!
—————————————-
शहरातून मोटार सायकल रैली..
शिवजयंती निमित्त बालकांनी घेतले शिवछत्रपतींचे बालस्वरूप..
—————————————-
मूर्तिजापूर :- महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अभिमानाचे प्रतिक असलेले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णा कृती पुतळा जवळ १९ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती च्या वतीने साजरी करण्यात आली. या वेळी आमदार हरिष पिंपळे, तहसीलदार शिल्पा बोबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, शहर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या सह सर्व पक्षिय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी महाराजांची पालखी तर दुपारी शहरातून भव्य मोटारसायकल रैली काढण्यात आली. या वेळी रॅलीवर ठीक ठिकाणी पुष्पवृष्टी करून रॅलीचे स्वागत करण्यात आले तर रॅलीमध्ये “श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय – जय भवानी जय शिवाजी ” च्या घोषणाही देण्यात आल्या. तर रेल्वे प्रशासनाच्या वतीने रेल्वे सुरक्षा बल (RPF) कार्यालयातही श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आर. पी. एफ चे आय. पी. एफ सुनील कुमार सिंग, उपनिरीक्षक सुनील डोंगरे, सहाय्यक उपनिरीक्षक एस. एन रॉय, संदीप तायडे, अविनाश मडावी, जयदेव माने, भगवान साबळे, प्रमोद ढोले, मुकुंद खवले, शैलेश वर्घट, अजय राणे, अमित कृपाल, वाहिद खान, योगेश ठाकरे, अमित बारापात्रे आदी रेल्वे सुरक्षा बल चे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.