महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर शनिवारी मूर्तिजापूरात..!
———————————
अकोला /मूर्तिजापूर :- तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेल्फेअर सोसायटी द्वारे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांचा खेळ मांडीयेला कार्यक्रम मुर्तीजापुर येथे आयोजित केला आहे. हसत खेळत चालणारा हा कार्यक्रम महाराष्ट्राला सर्वदूर परिचित आहे.
सर्व महिलांचे भाऊजी आदेश बांदेकर आपल्या सर्वच वाहिनीसाहेबांना भेटण्या साठी येत असल्याने माता भगिनींनी आपल्या कॅलेंडर किंवा डायरी मधे २१ सप्टेंबर २०२४ दुपारी ३ वाजता ची वेळ नोंदवून ठेवावी. आपल्याला मूर्तिजापूर येथे ‘खेळ मांडीयेला’ या खेळा मध्ये सहभागी
व्हायचे आहे. असे आवाहन डॉ. सुगत वाघमारे यांनी केली आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून माता भगिनींना चार क्षण विरंगुळा मिळावा या हेतूने डॉ. सुगत वाघमारे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २१ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता लाल शाळा मैदान मूर्तिजापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना अक्षरशः वेड लावले आहे. आजपर्यंत विविध ठिकाणी हा कार्यक्रम झाला असून प्रत्येक ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक गर्दी असते. मनोरंजनासोबतच
ज्ञानप्राप्ती करून देणारा हा एकमेव कार्यक्रम आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात आदेश बांदेकर यांच्या हस्ते बक्षिसांची लयलूट होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे व या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन पत्रकार परिषदेत तीक्ष्णगत मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष, प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुगत वाघमारे यांनी केलेआहे. मूर्तिजापूर मतदार संघातील नागरिकांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी मतदारसंघातील विविध गावांमध्ये डॉ. सुगत वाघमारे यांनी यापूर्वीही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
———————————
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.