कुलपती डॉ विजय भटकर यांनी केली मुरंबा या गावाची पाहणी..!
जि. प शाळेत विध्यार्थ्यांना शालेय साहित्य केले वाटप..
जुन्या आठवणीत डॉ. विजय भटकर हरवले
—————————————-
मूर्तिजापूर :- तालुक्यातील मुरंबा या गावातील विविध कामांची नालंदा विश्व् विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी पाहणी करून ग्रामपंचायत कार्यालयात कामांचा आढावा घेतला. तर या वेळी त्यांनी जिल्ह्या परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.
. संगणकाचे जनक म्हणून अख्या जगात प्रख्यात असलेले नालंदा विश्व् विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनी आपल्या मूळ गावी मूर्तिजापूर तालुक्यातील मुरंबा येथे गावातील विकासात्मक कामांची पाहणी केली. या वेळी त्यांनी आवर्जून गावाकऱ्यांशी संवाद साधून गावातील समस्या जाणून घेतल्या.
डॉ. विजय भटकर यांनी मुरंबा या गावातील सौर ऊर्जा प्रकल्प, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रस्ते, शाळा व ग्रामपंचायत ची पाहणी करून या वेळी आपल्या गावाच्या विकासा बाबत सरपंच सौ. धनश्री अखिल भटकर यांना सूचना दिल्या.
जिल्ह्या परिषद शाळा मुरंबा येथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण घेऊन त्यांनी आपल्या यशाचे शिखर गाठले. जिल्ह्या परिषद शाळेतील विध्यार्थ्यांना डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने चौव्हाण सर व सौ खोकले मॅम तर ग्रामपंचायत कार्यालय मुरंबा यांच्या वतीने सौ. धनश्री अखिल भटकर, अखिल पाटील भटकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मुरंबा च्या सरपंच सौ धनश्री अखिल भटकर, अखिल पाटील भटकर, सौ खोकले मॅडम, चव्हाण सर, राहुल भटकर, सुनील सरिसे,संदीप कडू, संजय किडे, हर्षल भटकर, सूरज सरिसे आदी गावकरी उपस्थित होते.
—————————————
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.