कल्याण शहराच्या काही अंतरावर असलेल्या वसार गावातील गुरांच्या गोठ्याने अचानक लागलेल्या आगीने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असून आगीच्या धुरात म्हशीचा बछडा मृत्यूमुखी झाला आहे तर ही आग सुमारे रात्री १ ते २ च्या दरम्यान बाळकृष वाटले यांच्या गोठ्याला आग लागल्याने गोठा जळून खाक झाला झाला असून शेतकऱ्याचे जवळपास ३ , ४ लाखांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे .
अग्निशन दलाची गाडी वेळेवर न आल्याने आग नियंत्रणात आली असती परंतु आग्निशन वेळेवर पोहचू शकले नसल्याने म्हशीचा बछडा व मोठ्या प्रमाणात जनावरांचा चाऱ्यांच्या नुकसानाला सामोरे जावे लागल्याचे या वेळी शेतकरी हरेश वाटले यांनी सांगितले