जोशीबागेतील नागरिकांच्या वहिवाटेच्या रस्त्यावरून वादंग
=============
कल्याण वार्ताहर
कल्याण पश्चिमेतील जोशीबाग परिसरातील, आचिवर्स कॉलेजच्या इमारती मागील छोट्याशा पायवाटे संदर्भात स्थानिक नागरिक आणि कॉलेज प्रशासनात खडाजंगी पहायला मिळाली.सदर प्रकरणात वरील उल्लेखलेली पायवाट ही तेथील नागरिकांच्या रोजच्या वहिवाटीचा रस्ता असून ती कॉलेजच्या इमारतीच्या मागील बाजूला असून तेथून नागरिकांचे गेली 25/30वर्ष सतत येणेजाणे सुरू असल्याचं सांगण्यात आले.कॉलेज प्रशासनाने त्या वहिवाटेच्या जागेवर काही तांत्रिक बाबी साठी खोदकाम केले होते.ते काम बरेच दिवस तसेच अर्धवट अवस्थेत राहिल्या मुळे नागरिकांना विशेषतः महिलांना व लहान मुलांना येणेजाणे साठी लांबचा वळसा घालून यावे लागत असल्या कारणाने नागरिक त्रस्त झालेले होते.शाळा /कॉलेज प्रशासनाने जाणून बुजून
खोदकाम करून ठेवले असावे आणि नागरिकांची वर्षानुवर्षांच्या वहिवाटीवर कब्जा करून जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला.प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर असे आढळून आले की सदर जागेवर खोदकाम नक्कीच झालेले आहे.आणि ते अर्धवट अवस्थेत आहे.त्या संदर्भात कॉलेज प्रशासनाशी संपर्क साधला असता,प्रशासनाची दुसरी बाजूही समजून घेतली गेली.
प्रशासनाने सांगितले की,सदर वहिवाटेच्या जागेवर काही तांत्रिक बाबी साठी खोदकाम करण्यात आले होते.सदर रस्ता हा वहिवाटीचा असून त्या जागेवरून नागरिकांना जाण्या येण्या साठी कोणताही प्रतिबंध करण्यात आलेला नाही.प्रशासनाने सांगितले की त्या चिंचोळ्या जागेतून दुचाकी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.दुचाकी वाहने अत्यंत बेलागमपणे चालवत असल्याने शाळेच्या मुख्य प्रवेश दारातून विद्यार्थी आणि पालक या जा करतांना अनेकदा अपघात होत असतात.ते होऊ नये म्हणून सदर रस्ता वाहनांना बंद करण्याचा मानस आहे असे सांगितले.त्या विषयी केडीएमसी प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे.केडीएमसी प्रशासनाने सदर प्रकरणाची चौकशी करून योग्य ते निर्णय घेतला जाईल.असे सांगण्यात आले.