डोंबिवलीत भूमिपुत्रांच्या एकजुटीसाठी बैठक
===============
डोंबिवली वार्ताहर
डोंबिवली परिसरातील वाढत्या नागरीकरणाच्या वेगात स्थानिक भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्याया विरोधात आज भूमिपुत्रांच्या एकजुटीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
गावचे गावपण हरवून,विकासाच्या नावाखाली ,शहरीकरणाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे.धनदांडगे बिल्डर,त्यांना आश्रय देणारे राजकीय नेते,यांच्या भ्रष्ट कारभाराचा फटका स्थानिक भूमिपुत्रांना वारंवार बसतांना दिसतो आहे.भूमिपुत्रांच्या जमिनी बळकावण्यासाठी,गुंड प्रवृत्तीच्या परप्रांतीय बिल्डरांच्या अन्याय विरोधात आता भूमिपुत्र एकत्र झाले असून,शासनाने भूमिपुत्रांवर होणाऱ्या अन्यायाच्या संदर्भात त्वरित दखल घ्यावी,अशी मागणी भूमिपुत्रांच्या बैठकीत करण्यात आली.
जर शासनाने योग्य ती कारवाई केली नाही तर भूमिपुत्र संपूर्ण एकजुटीने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.कायद्याच्या चौकटीत राहून आंदोलनाचा इशारा देत भूमिपुत्रांच्या बैठकीत सर्वसंमतीने एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.ह्या बैठकीत संतोष केणे ,काळू कोमास्कर,गजानन पाटील,मधुकर माळी, राम म्हात्रे,दयानंद म्हात्रे,शशिकांत पाटील,पद्माकर पाटील,प्रेमनाथ पाटील, अँड.शशिकांत पाटील. आणि इतर अनेक पीडित भूमिपुत्र बैठकीसाठी हजर होते.