राष्ट्रीय महामार्गांवर डिझेल चा टँकर पलटी : वाहतूक विस्कळीत..
अपघातात जीवितहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ टाळला…
अकोला :- जिल्हातील मूर्तिजापूर तालुक्यात येत असलेल्या कुरनखेड येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर डिझेल ची वाहतूक करणाऱ्या ट्रक पलटी झाल्याने भीषण अपघात घडला.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर कुराणखेड येथे जामनेर वरून ओडिसा येथे डिझेल ची वाहतूक करत असलेला मुरलीधर कपंनीचा ट्रक क्रमांक जी. जे १२ बी. झेड ८५२० दुसऱ्या गाडीला वाचवण्याच्या नादात भीषण अपघातात घडला यात ट्रक पलटी झाल्याची घटना घडली. सुदैवाने अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसली, तरी ट्रक चालक विशाल यादव गंभीर जखमी झाल्याने त्यास वीर भागात सिंग आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या सदस्यांनी तात्काळ अकोला येथील शासकीय जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारर्थ दाखल केले. सदर अपघातातील ट्रक हा डिझेल ने भरलेला असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसली तरी सुदैवाने मोठी हानी होण्यापासून टाळली. मात्र सदर अपघातात नजिकच्या गावातील लोकांनी ट्रक मध्ये असलेले डिझेल चोरी केल्याचा प्रकार चक्क बोरगाव पोलीसां समोर घडला. मात्र पोलीस ट्रक मधील डिझेलची चोरी करणाऱ्यांनवर कारवाई करण्याऐवजी बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले.
घटनेची गांभीर्यता लक्षात घेता मूर्तिजापूर येथून अग्निशामक दलाच्या पथकासह रुग्णवाहीका घटना स्थळावर दाखल करण्यात आली. तर घटनेचे वृत्त समजताच कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपत्कालीन पथकाच्या सदस्यांनी धाव घेऊन आपले कर्तव्य बजावले. घटनेचा पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे.
___________
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.