मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय बँकर्स समितीची १६७ वी बैठक पार पडली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘राज्यस्तरीय बँकर्स समिती – महाराष्ट्र’ची १६७ वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सन २०२५-२६ साठी ₹४४ लाख ७६ हजार ८०४ कोटींच्या पत पुरवठा आराखड्यास मंजुरी देण्यात आली.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचा निर्णय घेत कृषी कर्ज पुरवठ्यावेळी सिबिल स्कोअरची अट लावू नये, अशी स्पष्ट सूचना बँकांना दिली. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता कर्जपुरवठा सुलभ व सुस्पष्ट असायला हवा.
सविस्तर वृत्त: mahasamvad.in/166378
#DevendraFadnavis #BankersCommittee #Maharashtra #KrushiKarj #SIBILLessLoans #FarmersFirst