आरपीआयचा मूर्तिजापूर मतदार संघाचा उमेदवार जाहीर
पत्रकारपरिषदेत सचिन कोकणे यांच्या नावाची घोषणा
मूर्तिजापूर – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) मूर्तिजापूर येथील होटल व्यास येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत आरपीआयचे जिल्हा प्रभारी सचिन कोकणे हे मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार असतील अशी अधिकृत घोषणा पक्षाचे राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील यांनी केली.
यावेळी कार्यकर्त्यांची बैठक व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, आंबेडकर चळवळीतील काही पक्ष इतर पक्षाच्या दावणीला बांधल्या गेले असून त्यांचे बाबासाहेबांची विचारधारा केव्हाचीच सोडली आहे. खऱ्या अर्थाने देशात आंबेडकरी विचारांचा आरपीआई पक्ष (आंबेडकर) हाच सर्वात मोठा पक्ष असून महाराष्ट्रात आमचा जास्तीत जास्त जागा लढविण्याचा विचार आहे, महाविकास आघाडीकडी सोबत राहून निवडणूक लढविण्याची आमची तयारी सुरु असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले, महाविकास आघाड़ी सोबत जुळले नाहीच तर स्वबळावर १८० उमेदवार महाराष्ट्रात उभे करणार असल्याचे पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीला बीना शर्त समर्थन दिले होते. पण विधानसभा निवडणुकीत सोबत राहून निवडणूक लढविण्याचा विचार असल्याचे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. आयोजीत पत्रकार परिषदेला राष्ट्रीय महासचिव डॉ. मोहनलाल पाटील, महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, प्रदेश सचिव कैलास मोरे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष संतोष इंगळे, जिल्हा प्रभारी सचिन कोकणे, रामदास घोंसले, आनंदराव कोकणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सीमा सरदार, सोनू मनोहरे आदी उपस्थित होते.
___________
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला