अब.. ब.. ब मुर्तीजापुर शहरात अजगराचा वावर..!
___________
अकोला :- जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे भर वस्तीत शिरला ७ ते ८ फूटचा अजगर तरीही काहींना सेल्फीचा मोह काही आवरेना!
रात्रीच्या सुमारास मूर्तिजापूर शहरातील जुनी वस्ती स्थित असलेल्या खासाब अली दर्गा मुस्लिम कबरस्थान परिसरात एक ७ ते ८ फुटाचा अजगर आढळला आणि एकच हाहाकार माजला या अजगरला येथील मुन्ना श्रीवास नामक सर्प मित्रांने व त्यांचे बंधू दिनेश श्रीवास यांनी काही इजा न करता शिताफीने पकडले आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन काटेपूर्णा अभयारण्यात सुखरूप सोडले. पण त्याआधी सर्व रहिवाश्यांनी या अजगरासोबत फोटो आणि सेल्फी काढण्यात मजा घेत असल्याचे दिसले. या ७ ते ८ फुट अजगर पयथन प्रजातीचा असून १५ किलो वजन असलेल्याचे सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांनी सांगितले. या अजगरास पाहण्यासाठी आणि त्याचा फोटो घेण्यासाठी लोकांची झुंबड उडाली होती.
तालुक्यात कुठेही साप अथवा अजगर निघाल्यास तेथे तात्काळ पोहचून रेस्क्यू करतो, कुठल्याही सरपटणाऱ्या प्राण्यास इजा न करता जीवदान देतो व नागरिकांच्या मनातील भीती दूर करतो परंतु आम्हा सर्पमित्रांना शासनाच्या वतीने असो अथवा लोकप्रतिनिधींच्या वतीने कुठलीही मदत अथवा रेस्क्यू करण्याकरिता लागणारे साहित्य पुरवल्या जात नसल्याचे खंत यावेळी सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांनी व्यक्त केली.
___________
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.