विधानसभा निवडणूकीसाठ जिल्ह्यात सहा अर्ज दाखल
————
आतापर्यंत ५२४ अर्जांची झाली उचल
————
अकोला पूर्व मधून रणधीर सावरकर यांचा अर्ज दाखल
———
अकोला पश्चिम मधून सर्वाधिक अर्जांची उचल
———
सहा जणांनी केले उमेदवारांनी अर्ज दाखल
——–
अकोला,
जिल्ह्यातील विविध मतदारसंघात आज एकूण सहा नामनिर्देशन पत्रे दाखल झाली.
अकोला पूर्व मतदारसंघात रणधीर प्रल्हादराव सावरकर यांनी भारतीय जनता पक्षातर्फे दोन अर्ज, तर विशाल भगवान पाखरे यांनी अपक्ष आणि विजय श्रीकृष्ण मालोकार यांनी अपक्ष म्हणून प्रत्येकी एक अर्ज दाखल केला. आज तीनजणांनी 4 अर्जांची उचल केली. आतापर्यंत 38 जणांनी 62 अर्जांची उचल केली.
अकोला पश्चिम मतदारसंघात एकही नामनिर्देशन दाखल झाले नाही. आज 4 व्यक्तींनी 8 अर्जांची उचल केली. आतापर्यंत 72 व्यक्तींनी 138 अर्ज नेले.
मूर्तिजापूर मतदारसंघात धनराज रामचंद्र खराडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. आज 5 व्यक्तींनी 7 फॉर्मची उचल केली. आतापर्यंत 47 व्यक्तींनी 106 अर्जांची उचल केली.
अकोट मतदारसंघात ललित सुधाकरराव बहाळे यांनी स्वतंत्र भारत पार्टीतर्फे अर्ज दाखल केला. आज 11 व्यक्तींनी 15 अर्जांची उचल केली. आतापर्यंत 77 व्यक्तींनी 120 अर्जांची उचल केली.
बाळापूर मतदारसंघात रईस अहमद शेख नुरा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. आज 17 व्यक्तींनी 35 अर्जांची उचल केली. आतापर्यंत 59 व्यक्तींनी 118 अर्जांची उचल केली.
———————————
विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News अकोला