भाजप चे आमदार हरीश पिंपळे यांनी धमकी दिल्याचा आरोप, अर्जुन लोणारे..
———————————-
अकोला :-
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरचे भाजप आमदार हरीष पिंपळे यांनी धमकी दिल्याचा आरोप एका व्यक्तीने केलाय. आमदार पिंपळे आणि या व्यक्तीमधील मोबाईल संवादाची ऑडियो क्लीप सध्या व्हायरल होतीये. मुर्तिजापूर शहरातील एका व्हाट्सअप गृपवरील चॅटींगवरून हा वाद झाल्याचं बोललं जातंय. अर्जून लोणारे असं या व्यक्तीचं नाव असून तो वारकरी असल्याचं बोललं जातंय. लोणारे यांनी मोदींच्या कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह्य शब्द वापरल्यानेच त्याला फोनवर जाब विचारल्याचं आमदार पिंपळेंनी ‘माझा’शी बोलतांना सांगितलंय. तर शहरातील रस्त्याच्या बांधकामात भ्रष्टाचारावरून जाब विचारल्यानेच आमदार पिंपळेंनी मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या व्यक्तीनं केलाये. पोलिसांच्या माध्यमातून आपल्यावर माफी मागण्यासाठी दबाव टाकल्या गेल्याचा आरोप त्यांनी केलाय. मात्र, काहीही झाले तरी आपण माफी मागणार नसल्याचं लोणारे यांनी स्पष्ट केलंय.
———————————-
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.