उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर फासे पारधी समाजाचे विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण..!
———————————-
* उपोषण स्थळी जिल्हा परिषद सदस्य सम्राट डोंगरदिवे यांची भेट.
———————————-
मूर्तिजापूर :- येथील विदर्भ आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष आनंद निर्दोष भोसले व फासे पारधी समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांकरिता आमरण उपोषण केलाय.
येथील सिरसो गायरान येथे राहत असलेल्या रहिवाशांना ८ अ नमुना ( मालकीचा हक्क ) मिळावा, प्रधानमंत्री घरकुल योजना व शबरी घरकुल योजना मिळाव्यात, सिरसो गायरान परिसरातील आदिवासी नगरातील नाल्या व रोड बांधकाम करावेत, परिसरात पथदिवे लावण्यात यावे आदी मागण्यांकरिता विदर्भ आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष आनंद निर्दोष भोसले यांच्या सह फासे पारधी समाजाच्या नागरिकांनी शासनाच्या विरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषणाचा पवित्रा स्वीकारलाय या उपोषण स्थळी जिल्हा परिषदेचे सदस्य सम्राट डोंगरदिवे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्यांकरिता शासन दरबारी झटणार असल्याचे यावेळी बोलतांना सांगितले.
आदिवासी समाजाच्या नागरिकांकरीता राज्यात ‘आदिवासी विकास महामंडळ ‘ असूनही मात्र आदिवासी जमातीच्या फासे पारधी समाजाच्या नागरिकांना मूलभूत सुविधे करीता आमरण उपोषण करण्याची वेळ पडत असल्याने शासनाच्या कार्यावर प्रश्न उभे राहत आहे. एकीकडे भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतातील कुठलाही नागरिक स्वतःच्या घरापासून वंचित राहता कामा नये या करीता प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना आदी योजनेसह स्वच्छता अभियान राबविते मात्र मुर्तीजापुर येथील सिरसो गायरान परिसरात आदिवासी नागरातील नागरिकांच्या घरी साधे स्वच्छालय ही नसल्याने पंतप्रधानांनी केलेली योजना गेली तरी कुठे असा प्रश्न येथील फासे पारधी समाजाच्या नागरिकांना पडलाय. १२ फेब्रुवारी २०२४ रोजी विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांच्या मध्यस्थीने येथील नागरिकांच्या मागण्या मान्य करून याची पूर्तता लवकरच करण्याचे आश्वासित करण्यात आले होते मात्र त्यावर अद्यापही कुठलीही कारवाई न झाल्याने फासे पारधी समाजाच्या नागरिकांना पुन्हा आमरण उपोषणाचा पवित्रा स्वीकारावा लागला असल्याचे सांगण्यात येत आहे.
———————————-
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.